बातम्या
विशाळगड पर्यटकांसाठी खुला
By nisha patil - 3/2/2025 5:08:53 PM
Share This News:
कोल्हापुरातील विशाळगड पाच महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुला झाला आहे. 7 जानेवारीपासून गडावर जाण्याची परवानगी मिळाली असून, प्रशासनाने काही नियम लागू केले आहेत.
आता सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत पर्यटकांना गडावर जाता येणार आहे. सायंकाळी 5 नंतर प्रवेश आणि मुक्कामास बंदी आहे. धार्मिक आणि इतर कार्यक्रमांसाठी प्रशासनाची परवानगी आवश्यक असेल.
विशाळगड परिसरात मासांहारी पदार्थ नेण्यास व शिजवण्यास मनाई आहे. सुरक्षेसाठी पर्यटकांची तपासणी केली जाईल. आदेशाचे पालन सर्वांना बंधनकारक असेल.
विशाळगड पर्यटकांसाठी खुला
|