बातम्या
विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रा. संदीप पाटील यांना एन.एस.एस. चा उत्कृष्ठ कार्यक्रमाधिकारी पुरस्कार जाहीर
By nisha patil - 10/21/2024 3:38:12 PM
Share This News:
राष्ट्रीय सेवा योजना रौप्य् महोत्सवी वर्षापासून महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्याकडून राष्ट्रीय सेवा योजने मध्ये उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या कार्यक्रम अधिकारी यांना विद्यापीठ स्तरावर त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रा. संदीप पाटील यांनी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर.कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये एड्स जनजागृती रॅली, वृक्षारोपन, पंचगंगा वाचवूया, स्त्रीभ्रूण हत्या, अंधश्रध्दा निर्मुलन, आझादी का अमृत महोत्स्व, मेरी मिटी मेरा देश, गणेश मूर्ती व निर्माल्य् संकलन, अनाथश्रम व वृध्दाश्रम येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन, वाहतूक सुरक्षा सप्ताहातील सक्रिय सहभाग , रक्तदान शिबीर आयोजन, शहर स्वच्छता अभियान तसेच निवासी शिबीराच्या माध्यमातून वसगडे,कणेरीवाडी, पोहाळे , भुयेवाडी, आंबवडे इ. गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान व प्रबोधनात्मक विविध उपक्रम, शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे.
या सर्व कामाची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या वतीने त्यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. सदरचा कार्यक्रम शुक्रवार दि.25.10.2024 रोजी सकाळी 10.00 वा. शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत राजर्षी शाहू सिनेट सभागृह येथे मा.कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के व अन्य् मान्य्वरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या निवडीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, कॉलेजचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रा. संदीप पाटील यांना एन.एस.एस. चा उत्कृष्ठ कार्यक्रमाधिकारी पुरस्कार जाहीर
|