बातम्या

विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अनोखी पदभ्रमंती

Vivekananda College students unique journey


By nisha patil - 9/7/2024 6:29:33 PM
Share This News:



विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अनोखी पदभ्रमंती

कोल्हापूर: पर्यावरणाचे सामान्य स्थितीतून होणारे विचलन आणि त्याचे दृश्य अदृश्य असे मानवी जीवनावर होणारे परिणाम हे शाश्वत विकासाला मारक आहेतमानवी बदलत्या जीवनशैलीने पर्यावरण संवर्धन आणि संगोपन या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम समाजात राबविले जातातबदलते हवामान आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामध्ये वनांचे कमी होत असलेले प्रमाण हे प्रमुख कारण आहेमानवी बदलत्या गरजा औद्योगीकरण आणि शहरांचा होणारा विस्तार यामुळे कृत्रिम रित्या मानवी हस्तक्षेपाने वृक्ष ऱ्हासाचे प्रमाण वाढत चालले आहेशहरी भागात वृक्ष लागवड आणि संगोपन ही संकल्पना थोडीशी अवघडाची आहे हे जाणून विवेकानंद महाविद्यालयातील पाच महाराष्ट्र बटालियन मार्फत राबविण्यात आलेल्या पर्यावरण संवर्धन वन कॅडेट वन ट्री या संकल्पनेनुसार पर्यावरणीय अनोखी पदभ्रमंती आयोजित करण्यात आली. सदरची पदभ्रमंती अतिग्रे आणि आरती या दोन्हीच्या सीमेवर असणाऱ्या जल विभाजक रामलिंग अल्लम प्रभू आणि धुळोबा या डोंगरावर आयोजित करण्यात आली.

या पदभ्रमंतीमध्ये वृक्ष लागवड ,जलकोश भरण आणि धार्मिक स्थळावरील कचरा संकलन ह्या गोष्टी करण्यात आले .या पदभ्रमंतीचा उद्देश वृक्ष लागवड जरी असला तरी मागील काही वर्षांपासून कमी काळात जास्त पडणारा पाऊस आणि वेगाने धावणारे पाणी यामुळे जमिनीमध्ये जल पुनर्भरणणाचे प्रमाण घटत चालले आहेवैज्ञानिक दृष्ट्या एक परिपक्व वृक्ष प्रचंड काळात हजारो लिटर पाणी आपल्या खोडांच्या खाली असणाऱ्या मुळांवरून जमिनीमध्ये नेत असते मात्र कमी काळात जास्त पडणारा पाऊस यामुळे डोंगराळ भागातील तीव्र उधाराचा परिणाम म्हणून हे जल पुनर्भरण कमी होत चालले आहे परिणाम स्वरूप डोंगरांवरील हिरवळीचा कालखंड हा नऊ महिन्यापासून दिवसेंदिवस कमी होत चालला आहे . यासाठी मोठ्या पक्षांच्या खोडालगत उताराच्या विरुद्ध दिशेने मोठ्या दगडांची पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने रचना केल्यास वृक्षांच्या मुळांवरून जमिनीमध्ये पुनर्भरण होणाऱ्या पाण्याची प्रमाण वाढत जाते .या संकल्पनेच्या आधारे ही पदभ्रमंती आयोजित करण्यात आली आणि शंभर वृक्षांच्या पायालगत जल पुनर्पणासाठी दगडांची रचना केली गेली जी सहज आणि सुलभ अशी आहेसदरच्या पदभ्रमंतीमध्ये 35 किलोमीटरचे अंतर विद्यार्थ्यांनी अथकपणे पूर्ण केले आणि धार्मिक स्थळावरील पर्यटकांनी केलेल्या कचऱ्याचेही संकलन करण्यात आले .

सदरच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आय क्यू एस सी समन्वयक डॉ श्रुती जोशी,  कॅप्टन सुनिता भोसले, प्रबंधक रघुनाथ जोग, जुनियर आर्ट्स कॉमर्स विभाग प्रमुख प्रा सौ शिल्पा भोसले, कर्नल मानस दीक्षित, कर्नल सुरेश काळे, सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभलेसदरच्या मोहिमेचे आयोजन लेफ्टनंट जितेंद्र  भरमगोडा आणि ट्रेनिंग जेसीओ सुभेदार मेंघाने यांनी केले पदभ्रमंतीमध्ये 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .


विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अनोखी पदभ्रमंती