बातम्या
विवेकानंद मध्ये श्री आर.जी. राणे व श्री एस.पी.मिसाळ यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न
By nisha patil - 1/8/2024 10:18:56 PM
Share This News:
श्री आर.जी.राणे व श्री. एस. पी. मिसाळ यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील आपली सेवा प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यांनी संस्थेशी एकनिष्ठ राहून समाजाप्रती मी देणे लागतो या भावनेने आपली सेवा बजावली आहे. आपणास दिलेले काम प्रामाणिकपणे पार पाडा. तरच जीवन सुखी होईल व असा सेवानिवृती सदिच्छा समारंभ होतो. त्यांचे सेवानिवृती नंतरचे जीवन आरोग्यपूर्ण व्हावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. असे प्रतिपादन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी श्री आर.जी.राणे व श्री. एस. पी. मिसाळ यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
याप्रसंगी विवेकानंद कॉलेजच्या प्रशासकीय स्टाफतर्फे श्री आर.जी.राणे व श्री. एस. पी. मिसाळ यांचा मा. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते श्रीफळ, पोशाख, पुष्पगुच्छ् व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उतर देताना श्री आर.जी.राणे व श्री. एस. पी. मिसाळ यांनी संस्थेने व महाविद्यालयाने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक व स्वागत श्री. हितेंद्र साळुंखे, प्रशासकीय कर्मचारी प्रतिनिधी व सहाय्यक ग्रंथपाल यांनी केले. मानपत्राचे वाचन श्री. अमित साळुंखे यांनी केले. आभार श्री अमर जाधव यांनी मानले व सुत्रसंचालन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ.सौ.नीता पाटील यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग व श्री.बी.आर.करपे यांनी मनोगत व्यक्त् केले. या प्रसंगी प्राध्यापक व प्रशासकीय वर्ग उपस्थित होता.
विवेकानंद मध्ये श्री आर.जी. राणे व श्री एस.पी.मिसाळ यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न
|