बातम्या
विवेकानंदच्या डॉ. संजय लठ्ठे यांना जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीत स्थान
By nisha patil - 9/20/2024 6:48:44 PM
Share This News:
जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची २०२४ साठीची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने सोमवारी जाहीर केली. त्यात विवेकानंद कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय लठ्ठे यांनी स्थान मिळविले. संशोधन गुणवत्ता निर्धारित करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठाने सायटेशन्स, एच निर्देशांक, सहलेखकत्व, संशोधन लेखकाची नेमकी भूमिका या घटकांचा विचार करून संयुक्त सूचक निर्देशांक काढून ही जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची क्रमवारी प्रसिद्ध केली. ही प्रणाली आयसीएसआर लॅबद्वारे एलसेव्हीअरने प्रदान केलेल्या स्कोपस डेटाचा वापर करते.
डॉ. संजय लठ्ठे यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, अंतर्गत मूल्यमापन हमी कक्षच्या समन्व्यक डॉ. श्रुती जोशी, कॉलेजचे प्रबंधक श्री. आर. बी. जोग यांचे सहकार्य लाभले.
विवेकानंदच्या डॉ. संजय लठ्ठे यांना जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीत स्थान
|