बातम्या
विवेकानंदच्या कु. भूमिका पाटीलची राष्ट्रीय तलवारबाजी
By nisha patil - 12/18/2024 3:21:29 PM
Share This News:
विवेकानंदच्या कु. भूमिका पाटीलची राष्ट्रीय तलवारबाजी
स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
कोल्हापूर दि.16 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर आयोजित छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत १९ वर्षाखालील गटामध्ये विवेकानंद कॉलेजमधे १२ वी सायन्स मध्ये शिकत असलेली कु. भूमिका पाटील हिने सुवर्ण पदक मिळविले.*
सदर स्पर्धेत एकूण ८ विभागातील (नागपूर, पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक) खेळाडू सहभागी झाले होते. तरी या सर्व खेळाडू मधून भुमिकाने सेबर व एपी प्रकारात सुवर्ण पदक मिळविले.*
भुमिकाला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, कनिष्ठ विभाग जिमखाना प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे व रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग, श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंदच्या कु. भूमिका पाटीलची राष्ट्रीय तलवारबाजी
|