बातम्या
कोल्हापूरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद
By nisha patil - 4/1/2025 10:38:17 PM
Share This News:
महावितरणच्या पुईखडी सबस्टेशनच्या मुख्य वीजवाहिनीच्या मासिक देखभाल-दुरुस्तीचे काम सोमवारी कंपनीकडुन हाती घेण्यात येणार आहे. यामुळे पुईखडी सबस्टेशनचा विद्युतपुरवठा बंद राहणार असुन येत्या सोमवारी व मंगळवारी दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
महावितरणच्या पुईखडी सबस्टेशनचे 33 के.व्ही. व 110 के.व्ही. मुख्य वीजवाहिनीचे मासिक देखभाल-दुरुस्तीचे काम सोमवारी महावितरण कंपनी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे पुईखडी सबस्टेशनचा विद्युतपुरवठा बंद राहणार असल्याने पाणी उपसा होणार नाही. तर सोमवारी व मंगळवारी दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काळम्मावाडी योजनेच्या मासिक देखभाल-दुरुस्तीचे काम व अमृत-1 योजनेंतर्गत बावडा फिल्टर नवीन पंपहाऊस येथील ग्रॅव्हिटी मेनचे क्रॉस कनेक्शन व सुभाषनगर पंपिंग येथील नवीन रायझिंग मेनलाईन जोडण्याचे काम, अशी सर्वच कामे सोमवारी व मंगळवारी हाती घेण्यात येणार असल्याने शहरातील ए, बी, सी, डी, ई वॉर्ड, मधील उपनगरे व ग्रामीण भागामध्ये दैनंदिन होणारा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच बुधवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलंय.
कोल्हापूरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद
|