बातम्या

दीड हजारात काय होतंय..? संजय रावतांचा सवाल...

What is happening in half a thousand


By nisha patil - 7/18/2024 6:34:18 PM
Share This News:



  शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी  लाडकी बहिण योजनेवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले,लोकसभेतील पराभवानंतर यांना लाडका छोटा भाऊ आठवू लागला आहे. त्यांना मिळणाऱ्या  मदतीबद्दल आमचा विरोध नाही. खर तरं बहिणीला जास्त मदत मिळायला हवी.  बहिण घर चालवत असते, स्त्री पुरूष समानता असायला हवी. दिड हजारात काय होतंय?, किमान 10 हजार तिलाही द्यायला हवेत.  परवा सगळे लाडके भाऊ  भरतीकराता जमा झालेले पाहायला मिळाले.   भावांची बेरोजगारी आधी दूर करायला हवी .   
     

छगन भुजबळांवर देखील संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत.  येत्या काळात कळेलच पवार साहेब काय आहेत. भुजबळ मोठे कलाकार आहेत. त्यांनी सिनेमातही कामं केलं, ते नाट्य देखील निर्माण करतात.   छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच आहेत.  विधानसभेच्या जागावाटपाचं काहीही ठरलेलं नाही.


दीड हजारात काय होतंय..? संजय रावतांचा सवाल...