बातम्या
इन्कम टॅक्सचा कोणता रेजिम फायदेशीर ठरू शकतो, नवा की जुना?
By nisha patil - 7/25/2024 12:34:50 PM
Share This News:
इन्कम टॅक्सचा कोणता रेजिम फायदेशीर ठरू शकतो, नवा की जुना?
लोकसभेत मंगळवारी (23 जुलै) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्राप्तिकर संदर्भात करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे.
नवीन कररचनेंतर्गत (न्यू टॅक्स रेजिम) आता 3 लाख ते 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के प्राप्तिकर भरावा लागणार आहे.
आधी ही मर्यादा सहा लाख रुपयांपर्यत होती. नवीन कररचनेतील इतर स्लॅबमध्येही काही बदल करण्यात आले आहेत.
याशिवाय स्टँडर्ड डिडक्शन ची मर्यादा देखील 50 हजारांवरून वाढवून 75 हजार रुपये करण्यात आली आहे. प्राप्तिकरातील या दोन बदलांमुळे करदात्यांना जास्तीत जास्त 17,500 रुपयांपर्यतचा फायदा होणार आहे.
या अर्थसंकल्पात नव्या कररचनेत (न्यू टॅक्स रेजीम) जरी बदल करण्यात आलेला असला तरी जुन्या कररचनेत (ओल्ड टॅक्स रेजीम) मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तीन लाख रुपयांपर्यतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर नाही.
या अर्थसंकल्पात नव्या कररचनेत (न्यू टॅक्स रेजीम) जरी बदल करण्यात आलेला असला तरी जुन्या कररचनेत (ओल्ड टॅक्स रेजीम) मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.तीन लाख रुपयांपर्यतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर नाही.
इन्कम टॅक्सचा कोणता रेजिम फायदेशीर ठरू शकतो, नवा की जुना?
|