बातम्या
कुठलं मंत्री आणि कुठलं खासदार.. इथे फक्त कार्यकर्त्यांचाच बाजार
By nisha patil - 1/25/2025 8:29:15 PM
Share This News:
कुठलं मंत्री आणि कुठलं खासदार..
इथे फक्त कार्यकर्त्यांचाच बाजार
कुठलं मंत्री आणि कुठलं खासदार इथं फक्त कार्यकर्त्यांचाच बाजार याची प्रचिती आज कोल्हापुरात बघायला मिळाली.. निमित्त होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याचं...
त्याचं झालं असं... राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आज कोल्हापुरात आले होते. सुमारे दोन तास उन्हात त्यांना भेटण्यासाठी महालक्ष्मी मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. एकनाथ शिंदेंनी मंदिर परिसरामध्ये प्रवेश केला आणि त्यांना भेटण्यासाठी एकच झुंबड उडाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर या प्रमुख नेत्यांना बाजूला सारून कार्यकर्ते शिंदेंच्या भेटीसाठी तुटून पडले.
वेळ अशी आली की नेत्यांनाही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की होऊ लागली. पोलिसांना ही गर्दी अनावर झाली .अखेर जबरदस्तीने का होईना कार्यकर्त्यांना हटवून उपमुख्यमंत्र्यांना दर्शन घेऊन जाण्यासाठी वाट मोकळी करून देण्यात आली.
एकंदरीत बघाय गेलं तर या ठिकाणी " कुठला मंत्री आणि कुठला खासदार हित फक्त कार्यकर्त्याचाच बाजार असं चित्र पहायला मिळालं.
कुठलं मंत्री आणि कुठलं खासदार.. इथे फक्त कार्यकर्त्यांचाच बाजार
|