विशेष बातम्या
जागतिक रेडिओ दिन का साजरा केला जातो…. ?
By nisha patil - 2/13/2025 6:29:10 PM
Share This News:
रेडिओ हेच मनोरंजनाचे आणि माहिती देण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम होते. आज डिजिटल युगात असूनही रेडिओची जादू कायम आहे. याच रेडिओच्या वारशाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. भारतासारख्या विस्तीर्ण आणि बहुभाषिक देशात रेडिओ संवादाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे.
रेडिओच्या माध्यमातून केवळ मनोरंजनच नाही तर शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, सरकारी उपक्रम आणि सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचवले जातात. विविध एफएम चॅनेल्स आणि डिजिटल रेडिओ सेवांमुळे ते आजच्या काळातही प्रचंड लोकप्रिय आहे.डिजिटल युगातही रेडिओची गरज संपलेली नाही. आजच्या तरुणांसाठी रेडिओ हे करिअरचे उत्तम क्षेत्र आहे, जिथे कला, नाव, प्रसिद्धी आणि पैसा यांचा मिलाफ आहे.
जागतिक रेडिओ दिन का साजरा केला जातो…. ?
|