बातम्या

घसा का बसतो ?

Why does the throat sit


By nisha patil - 7/25/2024 2:40:32 PM
Share This News:



आधी शिंका येतात, मग नाक गळते, घसा खवखवतो, खोकला येतो, घसा दुखतो व तापही येतो. असे तुम्हालाही याच क्रमाने बऱ्याचदा झाले असेल. यालाच आपण सर्दी-पडसे म्हणतो. 

विषाणूंच्या संसर्गानं सुरुवातीला सर्दी-पडसे होते. त्यानंतर पेशींची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने जिवाणूंचा संसर्ग होतो व घसा खवखवणे, ताप येणे अशी लक्षणे दिसतात. जिवाणूंच्या दुष्परिणामामुळे घशाला सूज येते. साहजिकच गिळायला त्रास होतो, गिळताना दुखते.

जिवाणूंचा संसर्ग जेव्हा स्वरयंत्रापर्यंत जाऊन पोहोचतो, तेव्हा तेथेही सूज येते. स्वरतंतूवरहीं (Vocal Cords) परिणाम होतो. आवाज निर्माण होण्यासाठी स्वरतंतू, स्वरयंत्र, घसा, जीभ हे सर्व निरोगी अवस्थेत असणे आवश्यक असते. जिवाणू संसर्गाने त्यांच्यावर सूज येते व साहजिकच आवाज बदलतो.


घसा का बसतो ?