बातम्या
भारताकडून मिळेल का बांगला देशाला मदतीचा हात...?
By nisha patil - 7/8/2024 2:52:43 PM
Share This News:
सरकारी नोकरीत आरक्षण हटवण्याच्या मागणीवरून निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळल्यावर शेख हसीना यांना पद आणि देश दोन्ही सोडावं लागलं आहे.आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत किमान 280 लोकांचा मृत्यू झाला आहे. शेख हसीना यांनी 17 कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात सुमारे 15 वर्षं सत्ता गाजवली आहे.शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन, त्या तात्पुरत्या आश्रयासाठी भारतात आल्या. यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील घनिष्ठ संबंधांबद्दल चर्चेला सुरुवात झालीय.या वर्षी जून महिन्यात शेख हसीना दोन आठवड्यात दोनवेळा भारत दौऱ्यावर आल्या होत्या.आतापर्यंत पोलीस आणि आणि
पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला त्या आल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आल्या होत्या.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केंद्रातील सत्तेचा तिसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर भारताचा दौरा करणाऱ्या त्या पहिल्या परदेशी नेत्या होत्या.
शेख हसीना भारत दौऱ्यावर आल्या असताना, नरेंद्र मोदींसोबत त्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले होते, “गेल्या वर्षभरात आम्ही दहावेळा भेटलो आहोत. पण ही भेट विशेष आहे. कारण सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात शेख हसीना आमच्या पहिल्या पाहुण्या आहेत.”याच मैत्रीपूर्ण सुरात शेख हसीना म्हणाल्या होत्या, “भारतासोबतचे संबंध बांगलादेशसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आम्ही आजवर काय केलंय आणि पुढे काय करण्याचं नियोजन आहे, हे पाहण्यासाठी बांगलादेशात या.”बांगलादेशमधील हिंसक आंदोलन हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं भारताचं म्हणणं आहे.
भारताकडून मिळेल का बांगला देशाला मदतीचा हात...?
|