बातम्या
आरोग्य संस्थांना अचानक भेटी देणार : ना. प्रकाश आबिटकर
By nisha patil - 1/30/2025 11:56:01 AM
Share This News:
राज्यातील सर्व परिमंडळातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक या राज्य व विभागीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यापासुन, महिन्यातून किमान दोन वेळा आरोग्य संस्थांना अचानक भेटी द्याव्यात अशा सूचना ना. प्रकाश आबिटकरांनी दिल्या.
ना. आबिटकर म्हणाले, आरोग्य संस्थांना अचानक भेटी देणार आहे. रुग्णालयातील स्वच्छता, सुरक्षा, परिसर स्वच्छता, रुग्णाच्या आहाराचा दर्जा, रुग्णालयात मिळणारी वागणूक, औषधांची उपलब्धता, बाह्य संस्थेद्वारे नेमलेल्या कर्मचाऱ्याना मिळणारे मानधन या बाबींची काटेकोर पाहणी करण्याचे तसेच काही अनियमितता आढळलयास संबंधितावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. शासनाच्या प्रत्येक दवाखान्यात दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करा.
आरोग्य संस्थांना अचानक भेटी देणार : ना. प्रकाश आबिटकर
|