बातम्या
सी. एस. आर. फंडातून खर्च करणार : ना. हसन मुश्रीफ
By nisha patil - 4/2/2025 1:53:41 PM
Share This News:
कोल्हापूरतील नऊ वर्षावरील आणि २६ वर्षापर्यंतच्या अविवाहित किशोरवयीन मुलींना गर्भाशयाचा कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
बाजारात साधारणता दोन हजार रुपये किंमत असलेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक म्हणजेच एच. पी. व्ही. ही लस सी. एस. आर. फंडातून सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत लसीकरण राबविणार असे ना. हसन मुश्रीफांनी सांगितले.
ना. मुश्रीफ म्हणाले, या मोहिमेसाठी उपयुक्त माहिती संकलन म्हणून वयानुसार किशोरवयीन मुलींची नावे आणि माहिती संकलित करण्याच्या सूचना अंगणवाडी व आशा स्वयंसेविका, प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभागांना दिल्या आहेत.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध पिंपळे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते
सी. एस. आर. फंडातून खर्च करणार : ना. हसन मुश्रीफ
|