राजकीय
गुंड प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी राजेश लाटकर यांना विजयी करा - विजय देवणे
By nisha patil - 12/11/2024 1:02:40 PM
Share This News:
गुंड प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी राजेश लाटकर यांना विजयी करा - विजय देवणे
उत्तर भारतीय नागरिकांशी लाटकर यांनी साधला संवाद
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील गुंड आणि स्वार्थी प्रवृत्तीला पराभूत करण्याचा निश्चय सर्वसामान्य जनतेने केला असून यासाठी महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन शिवसेना संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी केले. लाटकर यांच्यासाठी शहरात प्रचार करताना ते बोलत होते. कोल्हापूर शहरात विकास कामे केल्याचा कांगावा करणारे भ्रष्ट नेते आता जनतेला विविध आमिषे दाखवत आहेत.
मतदान जवळ येईल तसा पैशाचा महापूर सुद्धा येईल. पण कोल्हापूरच्या जनतेने गद्दारांना धडा शिकवण्याचे ठरवल्यामुळे येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी जनता या भ्रष्ट स्वार्थी नेत्याला जागा दाखवेल. एका बाजूला योजनांचा भुलभुलय्या आणि दुसऱ्या बाजूने वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य जनता बेजार झाली असून या खोटारड्या आणि फसव्या महायुती सरकारचा पराभव केल्याशिवाय माता-भगिनी स्वस्त बसणार नाहीत असे देवणे म्हणाले. लोकशाहीचे धिंडवडे उडवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार पाडण्याचा प्रकार जनतेला आवडलेला नाही. कोल्हापूरची जनता विचारी आणि स्वाभिमानी असून यांच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता गद्दारांना पराभूत करेल. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या एकजुटीमुळे एक सामान्य कार्यकर्ता आमदार होईल व कोल्हापुरात इतिहास घडेल असे ते पुढे म्हणाले.
राजेश लाटकर शहरातील विविध भागात नागरिकांच्या गाठीभेटी घेत असून त्यांना सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी शहरातील उत्तर भारतीय नागरिकांची भेट घेतली व त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू असे सांगून निवडून देण्याचे आवाहन लाटकर यांनी यावेळी केले.
गुंड प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी राजेश लाटकर यांना विजयी करा - विजय देवणे
|