बातम्या

हद्दवाढ, सर्किट बेंच आणि पासिंग विलंब शुक्ल साठीचा कोल्हापूर बंद मागे घ्यावा : कृती समिती आणि वाहनधारक समितीस शिवसेनेचे आवाहन

Withdrawal of Kolhapur Bandh for Delimitation


By nisha patil - 6/24/2024 7:41:54 PM
Share This News:



कोल्हापूर  : शिवसेना नेहमीच हद्दवाढ, सर्किट बेंचच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे महायुतीचे सरकार असून, सामंजस्याची भूमिका घेवून चर्चेअंती सुटणाऱ्या प्रश्नासाठी कोल्हापूर बंद सारखे स्वरूप देवून शहरवासियांना वेठीस धरणे अयोग्य आहे. हद्दवाढचा प्रस्ताव खुद्द मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनीच मागविला आहे. तर सर्किट बेंचसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. दरम्यानच्या काळात कोल्हापूरचे पालकमंत्री बदल आणि निवडणूक आचारसंहिता यामुळे या प्रक्रियांवर मर्यादा आल्या पण हद्दवाढ आणि सर्किट बेंच हे प्रश्न शिवसेनेचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदेच सोडवतील, असा विश्वास शिवसेनेच्या जिल्हा व शहर कार्याकारीच्या बैठकीस व्यक्त करत उद्या होणारा बंद मागे घ्यावा आणि चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा असे आवाहन कृती समिती आणि वाहनधारक समितीस करण्यात आले.
  

 यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, हद्दवाढ झाली तर शहरासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. हद्दवाढीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेच्या पायरीवर आमरण उपोषण केले आहे. मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब हद्दवाढीसाठी पहिल्यापासून सकारात्मक आहेत. नगरविकास मंत्री असतानाच त्यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे मागितला आहे. त्यानुसार प्रस्ताव सादरही करण्यात आला आहे. परंतु मधल्या काळात पालकमंत्री बदलले तसेच निवडणुकीची आचारसंहिता या मुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला असला तरी तो पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री

मा.एकनाथ शिंदे सक्षम आहेत. सर्वांना विश्वासात घेवून काम करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभले आहेत. खंडपीठाबाबतीत ही मा.मुख्यमंत्री शिंदे साहेब सकारात्मक आहेत. यासह काल, आज जिल्ह्यातील विविध वाहनधारक संघटनांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकरी अध्यक्ष  राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली. त्यांनी तात्काळ हा विषय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहचविला. मा.मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार तात्काळ वाहनांसाठी पासिंग विलंब शुक्ल रद्द करण्याचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तात्काळ मंजूर होवून वाहनधारकांनाही न्याय मिळणार आहे. याची माहिती संबधित वाहनधारक संघटनाना दिली गेली आहे. यासर्व बाबी पाहता आंदोलनाला राजकीय पार्श्वभूमीजोडून कोणी कार्यतत्पर मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यपद्धतीवर चिखलफेक करत असेल तर शिवसेना कदापि सहन करणार नाही. कोल्हापूर बंद साठी कारणीभूत प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून येत्या काही दिवसात याबाबत निर्णय होताना दिसून येईल. कोल्हापूर बंद करून शहरवासियांना कोंडीत पकडण्याऐवजी चर्चा करून यातून सकारात्मक मार्ग काढणे उचित ठरेल. त्यामुळे कृती समिती आणि वाहनधारक समितीने कोल्हापूर बंद मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. 
  

 या बैठकीस शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, जिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उदय भोसले, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, अमोल माने, प्रा.शिवाजी पाटील, समन्वयक सुनील जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, समन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, अनुसूचित जाती जमाती सेल जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, शहरप्रमुख प्रभू गायकवाड, फेरीवालेसेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, शहरप्रमुख विजय जाधव, महाराष्ट्र रिक्षा चालक सेना जिल्हाप्रमुख रमेश पोवार, समन्वयक विक्रम पोवार, शहरप्रमुख अल्लाउद्दिन नाकाडे, शहरप्रमुख राजू पोवार, बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख सुहास साका आदी उपस्थित होते.


हद्दवाढ, सर्किट बेंच आणि पासिंग विलंब शुक्ल साठीचा कोल्हापूर बंद मागे घ्यावा : कृती समिती आणि वाहनधारक समितीस शिवसेनेचे आवाहन