बातम्या

चारित्र्याच्या संशयावरून महिलेचे मुंडण, भुवयाही काढल्या

Woman shaved


By nisha patil - 3/4/2025 5:26:52 PM
Share This News:



चारित्र्याच्या संशयावरून महिलेचे मुंडण, भुवयाही काढल्या
 
तक्रार करूनही पोलिस कारवाई शून्य, पीडितेची न्यायासाठी भटकंती

महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत पती, नणंद आणि मेहुण्याने तिचे मुंडण करून विद्रूपीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. धाराशिव जिल्ह्यातील पीडित महिलेने सोलापूरच्या बार्शी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असली तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
 

पीडितेच्या आरोपानुसार, नणंद आणि मेहुण्याचे प्रेमसंबंध होते, हे उघड होऊ नये म्हणून तिला छळले गेले. संशय घेत तिचे केस कापण्यात आले, जबरदस्ती कबुली घेतली, आणि त्याचा व्हिडिओही शूट करण्यात आला. 2017 पासून घरगुती हिंसाचाराचा सामना करत असलेल्या महिलेने 2023 मध्ये घर सोडले होते. मात्र, पुन्हा सासरी परतल्यानंतर तिचा छळ सुरूच राहिला.
 

सध्या न्याय मिळावा म्हणून पीडित महिला आणि तिची आई भटकंती करत असून, पोलिस कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.


चारित्र्याच्या संशयावरून महिलेचे मुंडण, भुवयाही काढल्या
Total Views: 14