बातम्या
गांधीजींनी शिकविलेल्या आत्मबलाचा वापर स्त्रियांनी राजकारणात करावा - किशोर बेडकिहाळ
By nisha patil - 1/2/2025 6:51:05 PM
Share This News:
गांधीजींनी शिकविलेल्या आत्मबलाचा वापर स्त्रियांनी राजकारणात करावा - किशोर बेडकिहाळ
कोल्हापूर, दि. 1 फेब्रुवारी – स्वातंत्र्य संग्रामात गांधीजींनी अहिंसा आणि आत्मबलाचा मार्ग अवलंबत स्त्रियांना राष्ट्रीय चळवळीत सामील केले. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्त्रियांचा सक्रिय सहभाग वाढला. आजच्या राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व मिळालं आहे आणि त्यांनी गांधीजींनी शिकवलेल्या आत्मबलाचा वापर समाजाच्या भल्यासाठी करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि राज्यशास्त्र अधिविभागाच्या संयुक्त विद्यमाने महिलांमधील राजकीय साक्षरतेवर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती कांचनताई परूळेकर, स्वयंसिध्दा, कोल्हापूर यांच्या हस्ते झाले. कांचनताई परूळेकर म्हणाल्या, "समाजातील स्त्रिया अबला नाहीत, त्या सबला आहेत. महिलांनी आगामी लोकसभा आणि विधानसभेतील आरक्षणासंदर्भात जागरूक राहून त्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे."
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. जी. पवार, संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी डॉ. प्रकाश पवार, डॉ. नेहा वाडेकर, डॉ. सचिन भोसले, डॉ. नितीन रणदिवे आणि डॉ. उर्मिला दशवंत यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री. रविंद्र खैरे यांनी केले.
गांधीजींनी शिकविलेल्या आत्मबलाचा वापर स्त्रियांनी राजकारणात करावा - किशोर बेडकिहाळ
|