बातम्या

रॅम्पवर सजली महिलांची दुनिया: कोल्हापुरातील फॅशन शोने दिली बालीच्या प्रवासाची संधी!

Womens world adorned on the ramp


By nisha patil - 1/13/2025 7:51:20 PM
Share This News:



रॅम्पवर सजली महिलांची दुनिया: कोल्हापुरातील फॅशन शोने दिली बालीच्या प्रवासाची संधी!

 इन्हेरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजच्या वतीने आयोजित केलेला भव्य फॅशन शो शनिवार, 11 जानेवारी 2025 रोजी बालाजी गार्डन पार्क येथे थाटात पार पडला. महिलांसाठी खास आयोजित या शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे म्हणजे प्रथम विजेत्यास बाली ट्रिप, क्राऊन आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. याशिवाय, डान्स लकी ड्रॉ, फन गेम्स, आणि मनोरंजनाने कार्यक्रम अधिक रंगतदार बनला.

या स्पर्धेत महिलांनी आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करत आपली ओळख आणि कौशल्य सादर केले. या फॅशन शो ची मुख्य विजेती  अनिता गडकरी
– बाली ट्रिप, क्राऊन, आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं तर
मुख्य विजेती: सान्वी बंसारी ही झाली या फॅशन शो ची फर्स्ट रनर अप श्रेया सावंत दुसरी रनर अप 
डॉ. स्फूर्ती जाधव पाटील तर तिसरी रनर अप  डॉ. कविता वाळवेकर या ठरल्या उत्तेजनार्थ बक्षिसाच्या मानकरी स्मिता खामकर ह्या ठरल्या

इन्हेरव्हील क्लबच्या  संस्थापिका अध्यक्षा स्मिता सावंत मांडरे यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विविध मनोरंजनात्मक उपक्रम, गेम्स, डान्स आणि स्टॉल्समुळे या शोला अधिक आकर्षक बनवण्यात आले. क्लबच्या टीमने उत्कृष्ट व्यवस्थापन करत हा शो यशस्वी केला.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या क्षमतांना वाव देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल होण्यास मदत होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले. मीडिया पार्टनर म्हणून या शोसाठी तारा न्यूजने काम पाहिले


रॅम्पवर सजली महिलांची दुनिया: कोल्हापुरातील फॅशन शोने दिली बालीच्या प्रवासाची संधी!
Total Views: 33