शैक्षणिक

विवेकानंदमध्ये अग्रणी महाविद्यालय अंतर्गत कार्यशाळा संपन्न

Workshop held at Vivekananda


By nisha patil - 3/17/2025 4:31:06 PM
Share This News:



विवेकानंदमध्ये अग्रणी महाविद्यालय अंतर्गत कार्यशाळा संपन्न

 कोल्हापूर दि. १७ :   विवेकानंद महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने  न्यू कॉलेज क्लस्टर अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत "Emerging Trends in Advanced Instrumental Techniques" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

सदर कार्यशाळेस शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे डॉ. अनिल घुले व युसिक चे डॉ. ज्योतीप्रकाश यादव यांनी मार्गदर्शन केले. प्रथम सत्रामध्ये 'Thermal Analysis' या विषयावर डॉ. अनिल घुले तर द्वितीय सत्रामध्ये 'Use of Analytical Techniques for Characterization' या विषयावर डॉ. ज्योतीप्रकाश यादव यांनी कार्यांयशाळेस उद्बोधित केले. 

या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे महावीर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उषा पाटील, न्यू कॉलेज, महावीर कॉलेज व गोखले कॉलेज कोल्हापूर चे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित राहिले. या कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सौ. एस. डी. शिर्के, अग्रणी महाविद्यालाचे समन्वयक डॉ. विशाल वाघमारे, कार्यशाळा समन्वयक डॉ. ए. एन. अंभोरे, प्रबंधक श्री. आर. बी. जोग, डॉ. एस. ए. कुंभार यांचे मार्गदर्शन मिळाले.


विवेकानंदमध्ये अग्रणी महाविद्यालय अंतर्गत कार्यशाळा संपन्न
Total Views: 33