बातम्या
विवेकानंद मध्ये “ नॅकला सामोरे जाताना ” या विषयावर कार्यशाळा
By nisha patil - 7/16/2024 9:09:53 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये IQAC आणि इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी “नॅकला सामोरे जाताना” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी गणित विभागप्रमुख प्रा.एस.पी.थोरात हे होते.
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील सॉफ्ट स्कील ट्रेनर डॉ.वैशाली शिंदे ह्या उपस्थित होत्या. त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी संवाद कौशल्ये व शिष्टाचार या विषयावर माहिती दिली व प्रश्नोतराव्दारे संवाद साधून शंका निरसन करण्यात आले.
कॉलेजमधील IQAC विभागाच्या समन्वयक डॉ.श्रृती जोशी यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना महाविद्यालयातील प्रशासकीय वर्ग हा देखील एक महत्वाचा अविभाज्य घटक असल्याचे नमूद केले. प्रशासकीय सेवकांसाठी महाविद्यालय विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. महाविद्यालय नॅक च्या 4थ्या सायकलला सामोरे जात असून पिअर टीम प्रत्यक्ष भेटीवेळी करावी लागणारी तयारी यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. कार्यक्रमात पुढे इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ.कविता तिवडे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली IQAC व इंग्रजी विभागाने केले होते. शेवटी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग यांनी आभार मानले. यावेळी सहाय्यक ग्रंथपाल श्री.हितेंद्र साळुंखे, अधीक्षक श्री एस के धनवडे, प्रा माधुरी पवार, प्रा.कोमल व्होनखंडे व सर्व प्रशासकीय सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा सुप्रिया पाटील यानी केले.
विवेकानंद मध्ये “ नॅकला सामोरे जाताना ” या विषयावर कार्यशाळा
|