बातम्या
‘गोकुळ’ मध्ये वसुबारस निमित्त म्हैस व गाय-वासराचे पूजन उत्साहात
By nisha patil - 10/28/2024 10:21:20 PM
Share This News:
‘गोकुळ’ मध्ये वसुबारस निमित्त म्हैस व गाय-वासराचे पूजन उत्साहात
कोल्हापूर, ता.२८: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने वसुबारस दिनानिमित्त म्हैस व गाय-वासराचे पूजन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व इतर धार्मिक विधी संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. यावेळी संघाचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व महिला स्वयंसेविका यांच्या उपस्थितीत संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे संपन्न झाला.
यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, आपल्या संस्कृतीची जपणूक तसेच उत्तम पशुसंवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने गोकुळमार्फत वसुबारस कार्यक्रमाचे आयोजन जाते. वसुबारस हा भारतीय संस्कृतीमध्ये जनावरांच्या प्रती आदर व प्रेम व्यक्त करण्याचा सण आहे. जुन्या चालीरीतींचे जतन व्हावे तसेच भारतीय संस्कृतीचीही जपणूक व्हावी व यातून दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी गोकुळ नेहमीच प्रयत्नशील आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत असून गोकुळमुळे जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने नंदनवन झाले आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी गाय व वासरू सोबत म्हैशीचे हि पूजन करण्यात आले. तसेच सर्वांना दिवाळीच्या शुभेच्या दिल्या.या कार्यक्रमाचे आभार संचालक प्रकाश पाटील यांनी मानले, सूत्रसंचालन डॉ.एम.पी.पाटील यांनी केले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी उपस्थित होते.
‘गोकुळ’ मध्ये वसुबारस निमित्त म्हैस व गाय-वासराचे पूजन उत्साहात
|