बातम्या

यशश्री शिंदे हत्याकांडानंतर उरणमधील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका

Yashashri shinde


By nisha patil - 7/29/2024 2:10:50 PM
Share This News:



उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने यशश्रीला अक्षरश: हालहाल करुन ठार मारल्याची  माहिती समोर आली होती. या नराधमाने तिच्या मृतदेहाची विटंबना केली. तिच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. यानंतर उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपामध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता.

      पोलिसांना या मृतदेहाचा पत्ता लागेपर्यंत तेथील कुत्र्यांनी यशश्रीच्या मृतदेहाचे लचके तोडले होते. त्यामुळे अत्यंत भयावह अवस्थेत यशश्रीचा मृतदेह आढळून आला. यशश्रीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अखेर तिच्या आई-वडिलांना घटनास्थळी बोलवण्यात आले. यशश्रीचे कपडे आणि तिच्या अंगावरील टॅटूवरुन तिची ओळख पटवण्यात आली.या घटनेनंतर संपूर्ण समाजातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणातील संभाव्य आरोपी दाऊद शेख याच्यावर कठोर कारवाईची आग्रही मागणी होत आहे.
     

यशश्री शिंदे हिच्या हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. याप्रकरणातील आरोपी दाऊद शेख असल्यामुळे हा लव्ह जिहादचा प्रकार आहे, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे.

नितेश राणे आणि प्रवीण दरेकर यांनी लव्ह जिहादचा आरोप करत अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्याची मागणी केली आहे. आमचं हिंदुत्त्वावादी सरकार दाऊद शेखला शोधून काढून त्याला योग्य ती शिक्षा देईल, असे नितेश राणे यांनी सांगितले. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही आरोपीवर कठोर कारवाई होईल, असे आश्वासन दिले. पीडीत मुलगी दलित समाजातील होती, त्यामुळे अॅट्रॉसिटी कायदा लागणार आहे. दाऊद शेखबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, यांची ही पद्धत आहे, मुलींना फसवतात, पळवतात आणि मग मारून टाकतात.

तीन महिन्यांपूर्वी मानखुर्द परिसरातील एका मुलीची इथं आणून अश्याच प्रकारे हत्या करण्यात आली होती. हे लव्ह जिहादचे प्रकार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.


यशश्री शिंदे हत्याकांडानंतर उरणमधील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका