बातम्या

'योगमित्रने 'जपली सामाजिक बांधिलकी!!

Yogamitra kept social commitment


By nisha patil - 1/27/2025 9:39:52 PM
Share This News:



'योगमित्रने 'जपली सामाजिक बांधिलकी!!

कोल्हापूर: कोल्हापूरमधील योगमित्र ग्रुपचा पहिला वर्धापन दिन २६ जानेवारी २०२५ रोजी उमेद फाउंडेशनच्या कोपार्डे, ता. करवीर येथील मायेच्या घरात साजरा करण्यात आला. यावेळी योगमित्राच्या सदस्यांनी मुलांसोबत योगासनोंची माहिती देऊन त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास करण्यासाठी विविध आसने व श्वसन पद्धती शिकवल्या. मुलांसोबत गप्पा मारून त्यांना खाऊ दिला आणि उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांना अन्नधान्य देण्यात आले.

योगमित्र ग्रुपने प्रत्येक रविवारी योगाचे वर्ग घेण्याचे नियोजन केले आहे. योग शिबिरांचे आयोजन करून योगाचे महत्त्व लोकांना समजावण्याचे कार्य हे ग्रुप गेल्या वर्षभरापासून करत आहे.

या प्रसंगी योगमित्राचे सदस्य संजय पोवार, रूपाली पाटील, सुरेश देसाई, विश्वजीत पाटील, पल्लवी बकरे, उज्वला डफळे, शितल काजवे, सुषमा जाधव, सुचित्रा देसाई, सारिका पाटील आणि अनन्या पोवार उपस्थित होते.


'योगमित्रने 'जपली सामाजिक बांधिलकी!!
Total Views: 46