राजकीय
क्षीरसागर याना पंधरा वर्षे संधी दिली, आता तुमच्या या राजुला ५ वर्षे संधी देऊन बघा - राजेश लाटकर
By nisha patil - 11/18/2024 10:44:42 PM
Share This News:
क्षीरसागर याना पंधरा वर्षे संधी दिली, आता तुमच्या या राजुला ५ वर्षे संधी देऊन बघा - राजेश लाटकर
कोल्हापूर: माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्यामुळे उत्तरच्या मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. ज्या जनतेबरोबर मी गेली २५ वर्षे आहे त्यांचाच आशीर्वाद मला विजयपथाकडे घेऊन जाईल. तुम्ही राजेश क्षीरसागर यांना १५ वर्षे सत्ता दिली, आता तुमच्या या राजू लाटकरला ५ वर्षे संधी देऊन पहा. तुमच्या सहकार्याने संधीचे सोने करेन अशी ग्वाही राजेश लाटकर यांनी दिली. महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी येथील विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते.
आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि सभा पार पडली. लाटकर म्हणाले, जनतेच्या मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे माझा विजय निश्चित आहे. हा विजय माझा नाही तर गोरगरीब जनतेचा असेल, आमदार आपल्या दारी असा उपक्रम राबवून आपल्या समस्यांचे निवारण तर करीनच शिवाय येथील मैदानाचाही प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे अभिवचन या विशाल जनसमुदायासमोर देतो.असे ते म्हणाले. माझ्याकडून कधीही महिलेला मारहाण, बिल्डरला मारहाण, डॉक्टर, अधिकाऱ्यांना धमकाविणे असे प्रकार होणार नाहीत. माझे एकच मिशन असेल ते म्हणजे 'नो कमिशन नो खंडणी'. मी राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारातून वाढलो असून तुमच्यासारख्या मतदारांच्या बरोबरीने अनेक वर्षे कार्यरत आहे. त्यामुळे गुर्मी, टक्केवारीची भाषा कधीच येणार नाही. मी उत्तर मतदारसंघात कामाचा डोंगर उभा करेन.
उत्तर मतदारसंघात मी आणि दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील दोघेही आमदार सतेज पाटील यांच्या हाताखाली नियोजनबद्ध काम करून कोल्हापूरचे स्वरूप बदलू. यासाठी २० तारखेला प्रेशर कुकर समोरील बटण दाबून तुमच्यातील एक सामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याचे स्वप्न साकार करा आणि माझ्याबरोबर तुमचेही नाव सुवर्णाक्षरांनी नोंद करा. यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, धनंजय महाडिकांनी मुलासाठी स्वतःच्या पाहुण्याचा केसाने गळा कापला. असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केला. राज्याच्या इतिहासातील सर्वात महत्वाची अशी ही निवडणूक आहे. ही निवडणूक महाराष्ट्र धर्म म्हणजेच शिव-शाह-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेला वाचवण्याची लढाई आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा लढा आहे. म्हणूनच उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर हे प्रेशर कुकर चिन्ह घेऊन आपल्यासमोर आले आहेत. कोल्हापूरकरांना माझी विनंती आहे की येत्या वीस तारखेला प्रेशर कुकर समोरील बटन दाबून आपल्या राजुला आमदार करा आणि इतिहास घडवा असे आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केले. यावेळी माजी महापौर भीमराव पोवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि सर्वसामान्य कार्यकर्ता राजेश लाटकर यांना आमदार करून कोल्हापूरची स्वाभीमानी जनता इतिहास घडवणार. कदमवाडी-भोसलेवाडी येथील नागरिकांच्या समस्यांची जाण असणारे नेतृत्व विधानसभेत जाणे गरजेचे आहे.
आमच्या येथे पाण्याची टाकीचे काम पूर्णत्वाकडे न्यावयाचे आहे, त्याचबरोबर पुराच्या पाण्याची मोठी समस्या आहे. गुंठेवारीचे भूत तर सगळ्यांच्या मानगुटीवर बसलेले आहेच. याचबरोबर जिल्ह्याचा शाश्वत आणि परिपूर्ण विकास करावयाचा असेल तर आमदार सतेज पाटील मंत्री होणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या वीस तारखेला प्रेशर कुकरसमोरील बटण दाबून राजेश लाटकर यांना येथून १०० टक्के मतदान करून सतेज पाटील यांचे हात बळकट करूया. माजी नगरसेवक भारती पोवार, तौफिक मुल्लानी यांच्यासह आपचे संदीप देसाई, कॉ. अतुल दिघे, कॉ. रघुनाथ कांबळे, कॉ. सतीशचंद्र कांबळे, उदय फाळके, राजेंद्र आत्याळकर, संभाजी खवरे, संयुक्ता घाटगे, सीमा भोसले, दिपकसिंह पाटील, निलेश भोसले, उज्वला चौगुले, तात्यासो पाटील, बाजीराव जाधव, लक्ष्मण जानकर, दिलीप पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्षीरसागर याना पंधरा वर्षे संधी दिली, आता तुमच्या या राजुला ५ वर्षे संधी देऊन बघा - राजेश लाटकर
|