बातम्या
राजारामपुरीत गांजा विक्री करण्याऱ्या युवकास अटक
By nisha patil - 2/1/2025 9:41:48 PM
Share This News:
कोल्हापूर शहरात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक बंदोबस्त होता. दरम्यान थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या उद्देशाने संशयित आरोपी सनत देशपांडे साथीदारासह संशयास्पद स्थितीत वावरत होता.
गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे, हवालदार संदीप सावंत यांना संशयित देशपांडे गांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याजवळून ७८ हजार २५० रु. किमतीचा ३ किलो गांजा व मोबाईल, असा ८८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. व त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली.अशी माहिती पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिलीय.
गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये गांजा तस्करीचे प्रमाण वाढलं आहे.त्यात आता ही कारवाई करण्यात आलीय.
राजारामपुरीत गांजा विक्री करण्याऱ्या युवकास अटक
|