बातम्या
तरुणाईने आत्मभान ठेवून क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे विचार जोपासावेत...प्रा. डाॅ. अरुण शिंदे
By nisha patil - 4/1/2025 10:34:30 PM
Share This News:
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या शहर कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली. जयंतीनिमित्त महिला आघाडीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जीवन व सामाजिक कार्य या विषयावर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा बक्षीस वितरण सोहळा व प्रा. डॉ. सुजय पाटील यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या शहर कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली.याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्याख्याते प्रा. डॉ.सुजय पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनकाळ व आत्ताच्या स्त्रीला असलेले सर्व क्षेत्रातील व्यापक स्वातंत्र्य याचा आढावा घेत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष तरुणाई समोर उभा करत ,आत्मभान ठेवून समाजात वावरण्याचा संदेश दिला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. अरुण शिंदे म्हणाले, "मोबाईलच्या काल्पनिक दुनियेत तरुणाईने न भरकटता अधिकृत शासनमान्य प्रकाशित आत्मचरित्र वाचावीत.हल्ली इतिहासाची मोडतोड चालू आहे. अशावेळी तरुणाईने जागरूक राहून स्वतःची प्रगती साध्य करावी."
स्वागत प्रास्ताविक वैशाली सूर्यवंशी यांनी केले. तर आभार प्रिया जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन शितल पोवाळकर यांनी केले.
या कार्यक्रमास भाई बाबुराव कदम, बापू लाड, धोंडीराम हवालदार, रंगराव पाटील ,प्रकाश शिंदे, कुमार जाधव ,उमाजी सनदे, चंद्रकांत खोंद्रे ,सरदार पाटील, मधुकर हरेल, असलम बागवान ,गीता कदम ,अर्चना पांढरे ,रेखा पोवाळकर, गीता जाधव, माधवी हरेल आदींसह स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरुणाईने आत्मभान ठेवून क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे विचार जोपासावेत...प्रा. डाॅ. अरुण शिंदे
|