बातम्या

युवा सेना सदस्य शिवाजी जाधव यांनी केली इंगळी येथील पूरस्थितीची पाहणी...

Youvasena shivaji jadhav


By nisha patil - 7/28/2024 1:41:17 PM
Share This News:



युवा सेना सदस्य शिवाजी जाधव यांनी केली इंगळी येथील पूरस्थितीची पाहणी...


हातकणंगले : पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे इंगळी ता. हातकणंगले येथे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करत गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव यांनी नागरिकांना  धीर दिला.तसेच पूरपरिस्थितीने स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची भेट घेत त्यांच्या व्यवस्थेची पाहणी केली. स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेत पूरग्रस्त नागरिकांची योग्य काळजी घेत सर्व व्यवस्था करण्याची विनंती केली.

यावेळी माजी सरपंच बाबूराव पाटील,सरपंच दादासो मोरे,राजेंद्र पाटील,युवासेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील,प्रथमेश पाटील,भरत देसाई,विजय जाधव,शहरप्रमुख प्रवीण चव्हाण,पै.ओंकार भातमारे,प्रज्वल पाटील यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.!


युवा सेना सदस्य शिवाजी जाधव यांनी केली इंगळी येथील पूरस्थितीची पाहणी...