विशेष बातम्या

जिल्हा परिषद कोल्हापूरतर्फे A.I. प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार

Zilla Parishad Kolhapur conducts A I Training


By nisha patil - 7/4/2025 4:01:50 PM
Share This News:



जिल्हा परिषद कोल्हापूरतर्फे A.I. प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार

कोल्हापूर : प्रशासनातील सेवांची गुणवत्ता, लोकाभिमुखता आणि निर्णयक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने "कार्यालयीन गतिमानता अभियान" अंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत 100 दिवसांच्या 7 कलमी कृती आराखड्यांतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

शनिवार, दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधील Department of Technology (DOT) विभागातील M-LAB मध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील संगणक हाताळणाऱ्या एकूण 50 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी DOT विभागप्रमुख कविता ओझा यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांचे स्वागत करण्यात आले. देसाई यांनी या प्रशिक्षणामध्ये A.I. संदर्भातील कोणकोणत्या बाबींवर सखोल मार्गदर्शन होणार आहे, याची माहिती दिली.

त्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी A.I. तंत्रज्ञान व प्रशासन यामधील महत्त्वाच्या समन्वयावर मार्गदर्शन केले. मुख्य प्रशिक्षण सत्रात सहायक प्राध्यापक कबीर खराडे व प्रसाद गोयल यांनी प्रात्यक्षिकांसह A.I. चा वापर, त्याचे फायदे आणि प्रशासकीय सेवेमध्ये वापराचे महत्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आरोग्य विभागाचे अधीक्षक सचिन मगर यांनी प्रशिक्षकांचे विशेष आभार मानले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी ढालाईत आणि अधीक्षक अजय शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.

हा उपक्रम जिल्ह्यातील प्रशासकीय कर्मचार्‍यांना नवतंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.


जिल्हा परिषद कोल्हापूरतर्फे A.I. प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार
Total Views: 19