बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये स्टार्ट अप विषयावर व्याख्यान संपन्न
By nisha patil - 2/9/2024 11:45:32 PM
Share This News:
आजचे राशिभविष्य २ सप्टेंबर २०२४विवेकानंद कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागामार्फत 'एक्सप्लोरिंग बायोडायव्हर्सिटी फोर स्टार्टअप' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख सुहानी पाटील या विद्यार्थिनीने केली. प्राणीशास्त्र विभाग व श्रील सूर्या रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सामंजस्य करारा अंतर्गत विद्यार्थ्यांना डॉ. सुप्रिया कुसाळे यांनी व्याख्यानात प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी स्टार्टअप म्हणजे काय, प्रोजेक्ट कसा तयार करावा, ॲडव्हायझरी मेंबर्स, पिचिंग, एंजल इन्वेस्टर, वेंचर कॅपिटल, बिझनेस मॉडेल, मार्केट सर्वे अँड स्टडी, मार्केटिंग अँड सेल्स स्ट्रॅटेजी, फायनान्शिअल प्रोजेक्शन, फंडिंग, क्राउड फंडिंग, आणि इंक्युबेशन सेंटर यासह स्टार्टअप्ससाठी आवश्यक असलेल्या विविध घटकांवर सखोल माहिती दिली.
विशेषत: स्टार्टअप्सच्या यशस्वी उभारणीसाठी आवश्यक असलेल्या मुख्य घटकांवर त्यांनी जोर दिला. त्यांनी सांगितले की, एक यशस्वी स्टार्टअप तयार करण्यासाठी विचारपूर्वक प्लानिंग आणि समर्पण आवश्यक आहे. प्रोजेक्टची कल्पना आणि त्याची अंमलबजावणी, प्रोटोटाइप विकसित करणे, आणि बाजारपेठेची आवश्यकता ओळखणे या सर्व गोष्टींचे महत्वाचे स्थान आहे. ॲडव्हायझरी मेंबर्स आणि इन्वेस्टर्सच्या सहाय्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे, आणि मिडिया व इन्फ्लुएन्सर्सच्या मदतीने आपल्या स्टार्टअपला मार्केटिंग व प्रोत्साहन देणे हेदेखील महत्वपूर्ण आहे.
क्राउड फंडिंग आणि इंक्युबेशन सेंटर यांसारख्या नव्या फंडिंग पर्यायांबद्दल आणि त्यांचा उपयोग कसा करावा हे विद्यार्थ्यांना सांगितले. इंक्युबेशन सेंटर या विषयावर विशेषतः लक्ष केंद्रित करतांना, त्यांनी स्पष्ट केले की, या सेंटरच्या सहाय्याने स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळते आणि त्यांना आवश्यक तांत्रिक व व्यावसायिक मदत प्रदान केली जाते.
कार्यक्रमाचे आयोजन प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी. के. सोनटक्के यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. टी. सी. पाटील यांनी केले. श्री. जी. एच. फडके यांनी आभार मानले. डॉ. श्रुती जोशी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक, रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग यांचे मार्गदर्शन व सहकार्य या कार्यक्रमाला लाभले.
या कार्यक्रमात प्राणीशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्ञानवर्धक सत्राचा लाभ घेतला. स्टार्टअप्सच्या यशस्वी विकासासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक आणि व्यावसायिक ज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली, ज्यामुळे त्यांच्यातील उद्योजकीय क्षमता आणखी विकसित होईल अशी अपेक्षा आहे.
विवेकानंद कॉलेजमध्ये स्टार्ट अप विषयावर व्याख्यान संपन्न
|