बातम्या
सोमनाथ गणपती कुंभार यांची पुनश्च विभागीय अध्यक्षपदी निवड
By nisha patil - 10/2/2025 6:34:20 PM
Share This News:
शिर्डी (अहिल्यानगर) – कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत सोमनाथ गणपती कुंभार, तासगाव (सांगली) यांची विभागीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी साई संगम हॉटेल, शिर्डी येथे पार पडलेल्या या सभेत महाराष्ट्रभरातून ६०० ते ७०० प्रतिनिधी उपस्थित होते. समाजाच्या उन्नतीसाठी आणि संस्थेच्या बळकटीसाठी त्यांच्या कार्याची दखल घेत, ही निवड सर्वानुमते करण्यात आली.

नवनियुक्त अध्यक्ष सोमनाथ कुंभार यांनी समाजहिताच्या कार्यात सातत्य ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. संस्थेची ध्येयधोरणे सर्वसामान्य कुंभार समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निवडीबद्दल सोमनाथ कुंभार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांना पुढील कार्यासाठी श्री लिंगायत कुंभार समाज सेवाभावी संस्था, अंकली सल्लागार मंडळ, सांगली-कोल्हापूर जिल्हा लिंगायत कुंभार समाज संघटना,महिला आघाडी, कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र प्रदेशसर्व पदाधिकारी, संचालक मंडळ व समस्त समाजबांधव यांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
सोमनाथ गणपती कुंभार यांची पुनश्च विभागीय अध्यक्षपदी निवड
|