बातम्या
सैफ अली खानवर हल्ल्याच्या प्रकरणावर संजय निरुपम यांची मोठी प्रतिक्रिया
By nisha patil - 1/22/2025 5:22:51 PM
Share This News:
सैफ अली खानवर हल्ल्याच्या प्रकरणावर संजय निरुपम यांची मोठी प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी सैफच्या मानेजवळील बाजूत अडीच इंच चाकू काढल्याची माहिती दिली होती.
6 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सैफची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते.
डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ हसतमुख आणि फीट दिसल्याने अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाने या प्रकरणी प्रश्न विचारले आहेत. खासदार संजय राऊत यांनीही सैफच्या जलद प्रकृती सुधारणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, शिवसेना नेते संजय निरुपम यांनी लीलावती रुग्णालयातील डॉक्टर आणि सैफच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी 16 जानेवारीच्या रात्री नेमकं काय घडलं, यावर सैफच्या कुटुंबीयांनी आणि डॉक्टरांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी केली आहे.
सैफ अली खानवर हल्ल्याच्या प्रकरणावर संजय निरुपम यांची मोठी प्रतिक्रिया
|