बातम्या
दुधातील स्नेहबंध – हनुमान संस्थेची सभासदांना भेटवस्तू आणि बोनसची गोड भेट!
By nisha patil - 10/26/2024 3:34:16 PM
Share This News:
दुधातील स्नेहबंध – हनुमान संस्थेची सभासदांना भेटवस्तू आणि बोनसची गोड भेट!
दत्तवाड माजी जिल्हा परिषद सदस्य,आमचे आजोबा स्वर्गीय चनगोंडा कलगोंडा पाटील यांनी दुध उत्पादकांना चांगला भाव व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी हनुमान सहकारी दुध संस्था चालू केली.आज ५८ वर्षे पूर्ण झाले असून प्रतीवर्ष संस्थेकडून दुध उत्पादक सभासदांना बोनस व भेटवस्तू वाटप करण्यात येतो.
यावेळी संस्थेस चांगल्या प्रतीचे व निर्भेळ दुध पुरवठा करून जास्तीत जास्त दर फरक घेणार्या उत्पादकाचे पहिले तिन क्रमांक काढून त्यांना रोख रक्कम व भेटवस्तू प्रदान करत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सल्लागार राजू पाटील (गुमटे) यांनी व्यक्त केले.पाटील पुढे म्हणाले की दुध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांची पतनुसार कर्जाची हमी घेणेचे संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे.त्यामुळे सभासदांना अर्थीक झळ पोहोचणार नाही. संस्थेचे चेअरमन बाबासो पाटील म्हणाले की आमच्या संस्थेचे व्यवहार पारदर्शक असून सभासदांनी चांगल्या प्रतीचे दुध पुरवठा करुन चांगले दरफरक घ्यावा असे आवाहन केले.चालू वर्षी म्हैस दुध दर फरक ९.५० टक्के तर गाय दुध दर फरक ५.५० टक्के व प्रत्येक उत्पादक सभासदांना समृद्धी कंपनीचे घागर ,बाऊल देत असल्याचे सांगितले
यावेळी संस्थेचे लेखापरीक्षक-रमेशकुमार मिठारे यांनी चांगल्या प्रतीचे दुध पुरवठा करुन संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संचालक-अशोक पाटील, मिलिंद देशपांडे यांनीही आपल्या मनोगतातून संस्थेच्या कामाचे समाधान व्यक्त केले.तर संस्थेचे सभासद सचिन चिखले, संतोष घोरपडे यांनी संस्थेचे तत्पर सेवेमुळे मिल्कमशिन उपलब्ध करून देणे, संघाकडून असलेल्या विविध योजनांचा लाभ, अनुदान व संकटकाळी मदत केले बद्दल संचालक मंडळाचे आभार मानले.
यावेळी व्हा.चेअरमन- दौलत माने, संचालक -आण्णासो पाटील,सिदगोंडा पाटील,राजगोंडा पाटील,सागर झुणके,संपत्ती खेमलापूरे,बसगोंडा नुले,तेजस वराळे, प्रकाश पाटील, सेक्रेटरी-महादेव मठाले आदीसह संस्थेचे दुध उत्पादक सभासद उपस्थित होते.
दुधातील स्नेहबंध – हनुमान संस्थेची सभासदांना भेटवस्तू आणि बोनसची गोड भेट!
|