बातम्या
आ. अमल महाडिकांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट...
By nisha patil - 1/30/2025 12:20:15 PM
Share This News:
आ. अमल महाडिकांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट...
ॲक्वा पार्क उभारणीसाठी निधी देण्याची विनंती....
आ. अमल महाडिकांनी मंत्री नितेश राणेंची भेट घेतली. ॲक्वा पार्क उभारणीसाठी निधी देण्याची विनंती आ. अमल महाडिकांनी केलीय.
राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांची आ. अमल महाडिकांनी मुंबई येथे भेट घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक असलेले दर्जेदार मत्स्यबीज उत्पादन, मत्स्य खाद्य, मत्स्यबीज संगोपन, मत्स्य संवर्धन, हंगाम पूर्व व हंगामानंतरच्या पायाभूत सुविधा यासाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत एकात्मीक ॲक्वा पार्क उभारणीसाठी निधी देण्याची विनंती आ.अमल महाडिकांनी केलीय. या मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिलं आहे.
आ. अमल महाडिकांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट...
|