बातम्या

आ. अमल महाडिकांची जिल्हाधिकारी येडगे समवेत बैठक....

come Amal Mahadikas meeting with Collector


By nisha patil - 6/2/2025 12:55:55 PM
Share This News:



आ. अमल महाडिकांची जिल्हाधिकारी येडगे समवेत बैठक....

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत आ. अमल महाडिकांची विविध प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने विमानतळ विस्तारीकरणासह विमानतळ परिसरातील ग्रामपंचायतींच्या घनकचरा व्यवस्थापनावर विस्तृत चर्चा करण्यात आलीय. त्याचबरोबर शहरातील विविध क्रीडांगणे विकसित करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.

कोल्हापूर शहराच्या वाढीव गावठाणाची मोजणी, शहरालगतच्या मोठ्या गावांमध्ये असलेला प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावणे तसेच विभागीय क्रीडा संकुलात अद्ययावत शूटिंग रेंज आणि शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयाला जागा उपलब्ध करणे यासह विविध विषयांवर झालेल्या चर्चेत कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, विमानतळ प्राधिकरण आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतलाय.


आ. अमल महाडिकांची जिल्हाधिकारी येडगे समवेत बैठक....
Total Views: 55