राजकीय
निविदा प्रक्रिया न राबवता थेट कोटेशन मागवून खरेदीचा आरोप : भूपाल शेटे
By nisha patil - 1/25/2025 1:38:17 PM
Share This News:
निविदा प्रक्रिया न राबवता थेट कोटेशन मागवून खरेदीचा आरोप : भूपाल शेटे
महापालिकेकडून सीसीटीव्ही, प्रिंटरची थेट खरेदी
दीड कोटी रुपयांच्या या खरेदीची चौकशी व्हावी के. मंजुलक्ष्मींना निवेदन
महापालिकेकडून सीसीटीव्ही, प्रिंटरची थेट खरेदी प्रक्रिया चुकीची असून निविदा प्रक्रिया न राबवता थेट कोटेशन मागवून खरेदी केल्याचा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटेनीं केला. दीड कोटी रुपयांच्या या खरेदीची चौकशी व्हावी असे निवेदन प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केलीय.
महापालिकेकडून सीसीटीव्ही, प्रिंटरची थेट खरेदी प्रक्रिया चुकीची असून निविदा प्रक्रिया न राबवता थेट कोटेशन मागवून खरेदी केल्याचा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटेनीं केला. दीड कोटी रुपयांच्या या खरेदीची चौकशी व्हावी असे निवेदन प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केलीय. महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद ही देखील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. परंतु त्यांनी निविदा प्रक्रिया राबवून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची खरेदी केली महापालिकेने जिल्हा परिषदेपेक्षा तिप्पट दराने कॅमेरे खरेदी केलेत. त्यामुळे महापालिकेची ही प्रक्रिया संशयास्पद वाटत आहे याप्रकरणी सखोल चौकशी करावी सिस्टीम मॅनेजर यशपाल राजपूती यांनी एका विशिष्ट कंपनीलाच या कामाचा ठेका दिला आहे सुमारे दीड कोटी रुपयांच्या या खरेदीची चौकशी व्हावी असे या निवेदनात म्हटले आहे.
निविदा प्रक्रिया न राबवता थेट कोटेशन मागवून खरेदीचा आरोप : भूपाल शेटे
|