बातम्या

पन्हाळगडावर दिवाळीचा दीपोत्सव: कोल्हापूर हायकर्सचा 'एक सांज पन्हाळगडावर' उपक्रमाचे बारावे वर्ष

dipostav in pahnlala


By Administrator - 10/22/2024 6:03:03 PM
Share This News:



कोल्हापूर हायकर्सतर्फे पन्हाळगडावर दीपोत्सवाचे बारावे वर्ष साजरे केले जाणार आहे. 'एक सांज पन्हाळगडावर' या दीपोत्सवाची संकल्पना गड किल्ल्यांना दिवाळीच्या प्रकाशात उजळविण्याची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना सणासुदीच्या काळात अंधारात ठेवू नये, ही भावना या उपक्रमामागे आहे. गेली १२ वर्षे, दिवाळीत 'एक सांज पन्हाळगडावर' साजरा करण्याचा उपक्रम कोल्हापूर हायकर्सतर्फे होत आहे, ज्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

या वर्षीचा दीपोत्सव दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी पन्हाळगडावर होणार आहे. यामध्ये शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळ यांची प्रात्यक्षिके दाखवली जातील. संयुक्त जुना बुधवार पेठ मर्दानी आखाडा, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने तलवारबाजी, धनुष्यबाण, मल्लखांब यांसारख्या शिवकालीन युद्धकलेचे महत्त्व लोकांसमोर मांडले जाईल.

यासोबतच, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अविभाज्य घटक असलेल्या पन्हाळगडाचा इतिहास इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्याकडून ऐकता येईल. हे व्याख्यान अंबरखाना (धान्याचे कोठार) येथे होणार आहे.

यासाठी अधिक माहितीसाठी कोल्हापूर हायकर्सचे अध्यक्ष सागर श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

संपर्क क्रमांक: ८२३७०७९९९९ / ७७०७०९०७०९


पन्हाळगडावर शिवकालीन दीपोत्सव: कोल्हापूर हायकर्सचा ऐतिहासिक प्रकाशोत्सव