बातम्या

जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुपतर्फे अंध शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

donation to blind student


By nisha patil - 3/25/2025 6:36:10 PM
Share This News:



कोल्हापूर : जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुप तर्फे मिरजकर तिकटी, कोल्हापूर येथील अंध शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी मदतकार्य हाती घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत जवळपास ३५ ते ४० विद्यार्थ्यांना खाऊ, जीवनोपयोगी वस्तू आणि किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला ग्रुपच्या अध्यक्ष सौ. सुप्रिया सुनील शिंदे, उपाध्यक्ष सौ. छाया रेणुसे, सौ. तेजस्विनी देशपांडे, सौ. सारिका हिरेमठ, कल्पना बडकस आणि सौ. भाग्यश्री सोडसे या सदस्य उपस्थित होत्या.

या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुपतर्फे अशा उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंसाठी सातत्याने मदतीचा हात पुढे केला जात आहे. भविष्यातही अशा प्रकारचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा मानस असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.
 


जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुपतर्फे अंध शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात
Total Views: 61