बातम्या
डाॅ. उत्तम कुंभार यांचा वाढदिवस साजरा
By nisha patil - 12/24/2024 7:36:53 PM
Share This News:
मिरज :सुप्रसिद्ध अर्थोपेडीक व सर्जन तसेच कुंभार समाजाचे मार्गदर्शक व हितचिंतक डाॅ. उत्तम कुंभार, मिरज यांनी आपल्या अविस्मरणीय कार्याने समाजाच्या उन्नतीसाठी व प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन देत, समाजात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कार्यक्षमता, समर्पण आणि समाजप्रेमामुळे ते सर्वांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनले आहेत.
आज त्यांचा वाढदिवस असल्याने, श्री लिंगायत कुंभार समाज सेवाभावी संस्था, अंकली चे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, युवा कार्यकारणी व समस्त कुंभार समाज बांधव यांनी डॉक्टर कुंभार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
डाॅ. उत्तम कुंभार यांना दीर्घायु, उत्तम आरोग्य आणि समाजसेवेत अधिक यश प्राप्त होवो, अशी शुभेच्छा!
डाॅ. उत्तम कुंभार यांचा वाढदिवस साजरा
|