बातम्या

ऊस वाहतूकदारांची फसवणूक; तातडीने कार्यवाहीची मागणी

fraud of sugarcane transporters


By nisha patil - 12/2/2025 6:09:35 PM
Share This News:



ऊस वाहतूकदारांची फसवणूक; तातडीने कार्यवाहीची मागणी

मुंबई : राज्यभरात २ हजारांहून अधिक ऊस वाहतूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ऊस तोडणी मुकादमांवर ४२० सह विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने बैठक घेऊन फास्टट्रॅक कोर्टात गुन्हे चालवण्याची मागणी केली.

वाहतूकदारांच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाई होणे आवश्यक असून, गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी महामंडळात वाहतूकदारांचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी वाहतूकदार संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


ऊस वाहतूकदारांची फसवणूक; तातडीने कार्यवाहीची मागणी
Total Views: 39