बातम्या
दिव्यांग माहिती मेळाव्यात केंद्र ओळखपत्रांचे वितरण व योजनांची माहिती
By Administrator - 12/24/2024 6:13:30 PM
Share This News:
कोल्हापूर:आज राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, कोल्हापूर येथे नॅशनल करिअर सर्विस सेंटर मुंबई आणि जिल्हा कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग माहिती मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योग भवनचे प्रकाश कटाळे, नॅशनल करिअर सेंटरचे किशोर साखळे, अपंग बेरोजगार पुनर्वसन संस्थेचे सुमित शिंदे, गुलाब लोखंडे, अनिता कुरणे, भरत काळे, सिद्धू कांबळे, समर्थ माने, डॉ. युवराज मिठारी यांसह जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना केंद्राचे ओळखपत्र वितरित करण्यात आले. तसेच उद्योग भवनाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली गेली. या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना रोजगार आणि स्वावलंबनासाठी नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
या मेळाव्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला असून, त्यांना रोजगाराच्या विविध संधींची माहिती मिळाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
दिव्यांग माहिती मेळाव्यात केंद्र ओळखपत्रांचे वितरण व योजनांची माहिती
|