राजकीय
डॉ. प्रभू यांच्या नूतन विन्स हॉस्पिटलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By nisha patil - 6/3/2025 7:03:26 PM
Share This News:
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय प्रतीत यश ख्यातनाम डॉक्टर प्रभू यांच्या नूतन विन्स हॉस्पिटलचे उद्घाटन आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले.
अतिशय अद्यावत असे हॉस्पिटल माननीय डॉक्टर प्रभू यांनी उभारलेले आहे. विन्स या नावाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये निरो सर्जरीमध्ये एक अतिशय उदंड असा विश्वास डॉक्टर प्रभू यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी कमावलेला आहे.
आज डॉक्टर प्रभू यांच्या या नवीन हॉस्पिटलमुळे निश्चितच पश्चिम महाराष्ट्राच्या मेडिकल फिल्डमध्ये एक अतिशय गुणात्मक प्रगती झालेली आहे. यावेळी सदर हॉस्पिटलच्या शुभारंभ निमित्त डॉक्टर प्रभू यांना शुभेच्छा देताना केंद्रीय रसायन खत मंत्रालय महामंडळाचे संचालक डॉ. संजयदादा पाटील सोबत डॉ. संदीप पाटील हे उपस्थित होते. डॉक्टर प्रभू , कुटुंबीय व त्याच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा....
डॉ. प्रभू यांच्या नूतन विन्स हॉस्पिटलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
|