बातम्या
राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचे उदघाटन...
By nisha patil - 5/2/2025 1:14:26 PM
Share This News:
राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचे उदघाटन...
जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आलं. ना. प्रकाश आबिटकर बोलताना म्हणाले की , कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. या कर्करोगावर आज मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे.
व्यसनांमुळे कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असून लोकांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी आरोग्य विभागाने तसेच स्वयंसेवी संस्थांनी झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. निर्व्यसनी माणसांना होणारा कर्करोग हा अधिक चिंतेचा विषय आहे.
त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाई, डॉक्टर्स, कर्मचारी, आआरोग्य सेविका, आशा सेविका यांनी आजपासून श्रद्धेने आणि गतिमान काम केले तर आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असलेला महाराष्ट्र ‘कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ होईल. मुख कर्करोग सदृश आजारांचे बाबत माहिती पुस्तिकेचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमगोथू श्री रंगा नायक, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदिप गुप्ता उपस्थित होते.
राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचे उदघाटन...
|