बातम्या

जास्वंदीचे वेगवेगळे गुणकारी फायदे

medicinal benefits of Jaswandi


By nisha patil - 9/18/2024 8:38:06 AM
Share This News:



1.) वजन कमी करण्यासाठी (वेट लॉस) जास्वंदीचा उपयोग

वेट लॉससाठी जास्वंदीचा उपयोग चहा म्हणून करण्यात येतो. कारण जास्वंदीच्या चहामध्ये नैसर्गिक फॅट बर्न करणारे गुण असतात. जास्वंदीच्या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सीडंट असतं, जे शरीरातील मेटाबॉलिजम प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करतं. तसंच यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे उच्च रक्तदाब आणि यकृताशी संबंधित समस्यांपासून सुटका होण्यासाठी मदत करतात.

कसा बनतो जास्वंदीचा चहा 

2 कप पाण्यात जास्वंदीची फुलं आणि त्याची सुकी पानं टाकावीत. पाणी उकळवावं. पाणी जेव्हा अर्ध राहतं, तेव्हा हे खाली उतरवून गाळून घ्यावं. त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस आणि काही थेंब मध मिक्स करावा. अशा प्रकारे जास्वंदीचा स्वादिष्ट चहा तयार होतो. हा चहा दिवसातून २ ते ३ वेळा प्यायल्यास, तुम्हाला स्वतःलाच तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवेल.

2.) पाळी (पिरियड्स) शी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर आहे जास्वंद

साधारणतः महिलांना पिरियड्स उशीरा येणाची समस्या असते मात्र, असं नेहमी नेहमी होणं अथवा बऱ्याच कालावधीपर्यंत पाळी न येणं योग्य नाही. प्रत्येक स्त्रीला तिची महिन्याची पाळीची तारीख माहीत असते. कारण साधारणतः पाळीचं चक्र हे २८ दिवसांचं असतं आणि २८ किंवा ३० दिवसांनंतर पुन्हा मासिक पाळी येते. जेव्हा हे दिवस २८-३०-४० असे होतात आणि त्यानंतरही पाळी येत नाही, तेव्हा अशा अनियमित पाळीच्या समस्येतून सुटका होण्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी जास्वंदीच्या पानांचा चहा नक्की प्या. कारण महिलांच्या शरीरामध्ये एस्ट्रोजनची कमतरता असल्यामुळे हार्मोन्स असंतुलित होतात आणि याच कारणामुळे पाळीदेखील येत नाही किंवा उशीराने येते किंवा कधीकधी हेवी फ्लो होतो ज्यामुळे शरीर कमकुवत होते.अशावेळी जास्वंदीचा चहा प्यायल्यानंतर या समस्येपासून सुटका मिळते.

3.) त्वचेची काळजी घेण्यासाठी जास्वंदीचा उपयोग

जास्वंदीची पानं उकळवून व्यवस्थित मिक्सरमधून वाटून घ्या. त्यानंतर त्यात थोडासा मध घालून हलक्या हातांनी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिट्सनंतर थंड पाण्याने चेहरा नीट धुऊन घ्या. असं केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील कोरडेपणा जाऊन चेहऱ्यावर डागविरहित गोरेपणा येईल.

४.)  हेअर केअरमध्ये जास्वंदीचा उपयोग

जे लोक केसांच्या समस्यांमुळे त्रस्त आहेत त्यांच्यासाठी जास्वंदी अतिशय फायदेशीर ठरते. केसांचं गळणं, कोरडे होणं अथवा केस न वाढणं या सर्व समस्यांमध्ये जास्वंदीची पानं खूपच कामी येतात. तुम्हाला हवं तर जास्वंदीचं फुल आणि पानं यांच्या बनलेल्या पेस्टचा नैसर्गिक हेअर कंडिशनर म्हणूनदेखील तुम्ही उपयोग करू शकता. यामुळे तुमचे केस मुलायम, चमकदार होतातच पण हेल्दीदेखील होतात. आवळा पावडर आणि जास्वंदीच्या पानांना एकत्र करून मिक्सरमधून काढावं आणि मग केसांना लावून मालिश केल्यास, तुमचे केस गळणं पूर्णतः बंद होतं आणि तुमचे केस मजबूतदेखील दिसतील.

५.) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जास्वंदीचा उपयोग होतो
जास्वंदीचं सरबत स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. विशेषतः मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी हे चांगलं आहे. हे हृदय आणि मेंदू दोन्हीसाठी एनर्जी बुस्टर म्हणून काम करतं. तुमच्या वाढत्या वयासह जर स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास होत असेल तर जास्वंदीचं सरबत फायदेशीर आहे.

 
जास्वंदीचं सरबत कसं बनवावं (Hibiscus Syrup Recipe)
सर्वात पहिले जास्वंदीची ८ ते १० पानं आणि फुलं दोन्ही सुकवून वाटून घ्यावीत त्यानंतर त्याची पावडर करून घ्यावी आणि एअर टाईट डब्यामध्ये ही पावडर ठेवावी. दिवसातून कमीत कमी २ वेळा या पावडरीचं सरबत बनवावं अथवा दुधात घालून प्यावं. तुमची बुद्धी कॉम्प्युटरप्रमाणे काम करायला लागेल.


जास्वंदीचे वेगवेगळे गुणकारी फायदे