बातम्या

*लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचा विराट मोर्चा २१ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात*

morcha of lalbavata


By Administrator - 8/17/2024 12:24:49 PM
Share This News:



*लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचा विराट मोर्चा २१ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात*

कोल्हापूर: लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटना (सिटु) आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुका कमिटीच्या वतीने, बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी २१ ऑगस्ट २०२४ रोजी कोल्हापुरातील दसरा चौक येथून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व नोंदीत व अनोंदीत बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

*कामगारांच्या प्रमुख मागण्या*

या मोर्चामध्ये तपासणी ते उपचार योजनेत सुधारणा करणे, तसेच कामगारांच्या आई-वडिलांचा समावेश करणे, बांधकाम कामगारांना २० हजार रुपये दिवाळी भेट देणे, आणि ६० वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना महिन्याला १० हजार रुपये पेन्शन देणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय, लाभापासून वंचित ठेवणारी स्लॉट पद्धत बंद करण्याची देखील मागणी आहे.

*घरकुल योजनेत अडथळे: कामगारांमध्ये नाराजी*

घरकुल योजनेचे अर्ज मंजूर झाल्यानंतर देखील, अनेक कामगारांना अंतिम हप्ता मिळालेला नाही. यामुळे कामगारांमध्ये नाराजी आहे. तसेच, अर्ज मंजूर होऊनही लाभाची रक्कम खात्यावर जमा होत नसल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता आहे. या सर्व तक्रारींना वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला जात आहे.


*लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचा विराट मोर्चा २१ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात*