राजकीय

मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांचा राजे गटात प्रवेश आणि पाठींबा जाहीर

mushrif karykarte in raje gat


By Administrator - 10/23/2024 7:24:40 PM
Share This News:



बाचणी प्रतिनिधी: कागल विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत, असे दिसत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी गुरुपुष्यामृत नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर (ता. 24) समरजितसिंह घाटगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

बेलवळे खुर्द (ता. कागल) येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हसन मुश्रीफ समर्थक दिनकर कोतेकर यांच्या गटातील प्रमुख कार्यकर्त्यांनी हुकूमशाही प्रवृत्तीला कंटाळून राजे घाटगे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना पाठींबा जाहीर केला.

या कार्यक्रमात चंद्रकांत कांबळे, सातापा कांबळे, महाजी कांबळे, दिगंबर कांबळे, युवराज कांबळे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. राजे समरजितसिंह घाटगे यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत करत, जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे वचन दिले. त्यांनी सांगितले की, "कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहून काम केले आहे. जनता आता परिवर्तनासाठी सज्ज आहे, आणि या निवडणुकीत जनता मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे."

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सौरभ कांबळे यांनी स्वागत केले, तर सागर कांबळे यांनी आभार मानले.


मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांचा राजे गटात प्रवेश आणि पाठींबा जाहीर