बातम्या

'कॉफी विथ आमदार' उपक्रमात डॉ. विनय कोरे यांची मनमोकळी चर्चा..

n the Coffee with MLA activity


By nisha patil - 2/14/2025 12:21:40 PM
Share This News:



'कॉफी विथ आमदार' उपक्रमात डॉ. विनय कोरे यांची  मनमोकळी  चर्चा..

 शैक्षणिक उन्नतीसाठी डॉ. विनय कोरे यांची महत्त्वपूर्ण आश्वासने...

वारणानगर (ता. पन्हाळा) येथे शाहूवाडी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील पहिल्या ‘कॉफी विथ आमदार’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी उपक्रमशील शिक्षक, केंद्रप्रमुख व शिक्षक संघटना प्रतिनिधींसोबत शाहूवाडीतील शैक्षणिक प्रश्नांवर मोकळा संवाद साधला.

यावेळी डॉ. कोरे यांनी शिक्षक कमी असलेल्या गावांमध्ये मानधन तत्त्वावर शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांसाठी निवासी शिबिरे, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसाठी निधी देण्याची घोषणाही केली.

शिक्षकांनी यावेळी शिक्षक भरती, भौतिक सुविधा, धोकादायक इमारती, स्पर्धा परीक्षा शिबिरे, आणि अशैक्षणिक कामांमधून मुक्तता यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली.

कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी डॉ. विश्वास सुतार, शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव सुतार, केंद्रप्रमुख प्रकाश काळे यांच्यासह अनेक शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.


'कॉफी विथ आमदार' उपक्रमात डॉ. विनय कोरे यांची मनमोकळी चर्चा..
Total Views: 56