मनोरंजन

आणि अभिनेता नाना पाटेकरच्या घराची भुरळ सेलिब्रेटींनाही पडली...

nanapatekar home


By Administrator - 1/15/2025 4:28:16 PM
Share This News:




पुणे: अभिनय कौशल्यासोबतच साध्या राहणीसाठी प्रसिद्ध असलेल्या नाना पाटेकर यांच्या 'नानाची वाडी' चर्चेत आली आहे. पुण्याजवळ खडकवासला येथील डोणजे गावातील त्यांच्या 7-8 एकर शेतात उभारलेले हे शेतघर अनेक सेलिब्रिटींचे आकर्षण ठरले आहे.

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या या शेतात तांदूळ, हळद यांसारखी पिकं घेतली जातात. मोठी विहीर, दगडी बांधकामाचे शेतघर, फळा-फुलांची झाडं, जनावरांसाठी गोठा, सुंदर रस्ते, तलाव आणि शेतातील विविध सुविधा 'नानाची वाडी'ला खास बनवतात. या शेतघराला सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनीही भेट दिली असून, त्यांच्या साध्या पण आकर्षक जीवनशैलीची चर्चा सुरू आहे.


आणि अभिनेता नाना पाटेकरच्या घराची भुरळ सेलिब्रेटींनाही पडली...
Total Views: 188