बातम्या
थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने आणली “ही” नवी योजना...
By nisha patil - 1/15/2025 1:05:16 PM
Share This News:
थंडीच्या दिवसांत पचनशक्तीत बिघडली? थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने आणली “ही” नवी योजना....
घरफाळा थकबाकी एकरकमी भरल्यास दंडामध्ये सवलत...
घरफाळा थकबाकी एकरकमी भरल्यास दंडामध्ये ८० आणि ५० टक्के अशी दोन टप्प्यांत सवलत देण्याची योजना महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी जाहीर केलीय. १५ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यत ८० टक्के, तर १३९ मार्चअखेर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
कोल्हापूर शहरातील मिळकतधारकांनी घरफाळा थकबाकी एकरकमी भरल्यास दंडामध्ये ८० आणि ५० टक्के अशी दोन टप्प्यांत सवलत देण्याची योजना महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी जाहीर केलीय. १५ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत ही योजना राबविण्यात येणार आहे निवासी, अनिवासी मिळकतींसाठी १५ जानेवारी ते २८ फेब्रुवारीअखेर ८० टक्के, तर १३९ मार्चअखेर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. घरफाळ्या पाठोपाठ पाणीपट्टी आणि परवाना विभागाच्या करावरील दंडातही सवलत देण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त करदात्यानी या सवलती योजनेचा लाभ घेण्यासाठी थकीत कराचा एकरकमी भरणा करावा. महापालिकेच्या वेबसाईटवर व अँड्रॉईड मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. त्यावरुन गुगल पे, फोन पेद्वारे मिळकत कर भरणा करता येणार आहे. तसेच मिळकत कराची थकीत व चालू आर्थिक वर्षाची एकूण रक्कम जाणून लिंकचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने आणली “ही” नवी योजना...
|